Share/Bookmark

७ डिसें, २००९

" बाजार परत २१००० वर जाईल का? "


रविवार दि. ‍६ डिसेंबर
जागतिक बाजारांकडून काहीही स्पष्ट संकेत नाहीत आणि आपला बाजार consolidation phase मध्ये दिसतोय.अशा परिस्थितीत सोमवारी बाजार कसा राहील याचा अंदाज बांधणे कठीण आहे.मात्र आपली शेअर्सची निवड चांगली असेल तर उगाचच काळजी करायचे काही कारण नाही.बाजार हेलकावे नेहमीच खात असतो.त्याचा फायदा उठवता आला तर उत्तमच पण काही वेळेस शांत राहून संधीची वाट बघणे चांगले.
माझे काही मित्र नेहमी विचारतात- " बाजार परत २१००० वर जाईल का? " मित्रांनो, खरे म्हणजे या प्रश्नाचे उत्तर आपणां सर्वाना माहीत आहेच कि- नाहीतर आपण आपली गुंतवणूक काढून पोस्टांत सुरक्षीत नसती का ठेवली?
    मला काय म्हणायचे आहे ते लक्षांत आले का? शेअर बाजाराची धाव कायम वरच्या दिशेनेच राहिली आहे, आणि महायुद्धासारखी काही परिस्थिती ओढवली नाही तर ती भविष्यातही राहणार आहे.मधूनच थोडेफार हेलकावे आले म्हणून चिंता करण्याचे कारण नाही.
   मी गुरुवारी लिहीले होते कि सेसा गोवा break-out होण्याची शक्यता आहे.बाजाराचा मूड निगेटीव्ह असूनही दिवसाच्या शेवटी तो ३८० वरून ३८७ पर्यंत गेलेला दिसला.उद्या तो आणखी वाढेल, पण सकाळी अकरानंतर बाजार पडला तर थोड्या प्रमाणात विक्री कराच. स्टेट बेंक आता आणखी खाली येण्याची वाट बघा. भारती वाढत आहेच.डीएलएफ बाजाराने आधार दिला तर २-३ दिवसात ४०० वर जाऊ शकतो, मात्र बाजार पडला तर त्यात जास्त पडझड होत असते.इन्फोसिस अणि लारसन पडत्या बाजारात घेता येतील. 

Read more »

२७ नोव्हें, २००९

दुबईतल्या घडामोडी आणि भारतीय बाजार

दुबईच्या दोन बड्य़ा कंपन्यांमधील (दुबई वर्ल्ड आणि नाखील) कर्जबाजारी होण्याच्या घटनेने काल व आज जगभरचे बाजार हादरले. त्यात अमॆरिका व काही आशियाई बाजार काल बंद असल्याने मंदीवाल्यांनी या संधीचा फायदा उठवला असे दिसत आहे.अशा प्रकारच्या घटना होतात तेव्हा १-२ दिवस घबराटीमुळेच बाजार पडतात आणि त्यानंतरच त्या घटनांचा खरा अभ्यास होऊन त्यांचे कोठे, कसे आणि किती काळासाठी परिणाम होतील याचा अंदाज बांधला जातो.
आज प्रारंभी आपला बाजार असाच PANIC मध्ये होता आणि दुपारी मात्र तो सावरला. याला दुबई सरकारने दिलेले आश्वासन कारणीभूत होते कि भारतीय कंपन्यांची तेथील गुंतवणूक बर्यापैकी सुरक्षीत आहे असा अंदाज त्यामागे होता ते या घडीला सांगणे कठीण आहे.तुर्तास बाजार सावरला आहे पण जागतिक वातावरण आणखी बिघडल्यास तो पुन्हा खाली येण्याची शक्यता नाकारता येत नाही. चित्र स्पष्ट होत नाही तोवर मोठी खरेदी न करता रिअल ईस्टेट व बेंका, केपिटल गूड्स ईत्यादी शेअर टाळावे असे एकंदर सध्या तरी मत व्यक्त होत आहे.
याबबतीत अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा-किंवा खालील अड्रेस आपल्या अड्रेस बार मध्ये पेस्ट करा -


साखर कंपन्या आगामी काळात चांगला फायदा करून देतील, तसेच फार्मा व आय. टी. ही सध्या सुरक्षीत वाटत आहेत.पण पुढील आठवड्यापर्यंत वाट बघणे कधीही चांगले.

Read more »

२० नोव्हें, २००९

सोने आणि सेन्सेक्स यात आता चढाओढ !


या आधीच्या आपल्या अंदाजानुसार RIL व SBI यांनी आठवड्याच्या सुरुवातीस पुढाकार घेतल्याने बाजार वाढला होता.त्याप्रमाणेच रिला.केपिटल(८२० पासून ९२५) व अबान ओफ्शोअर(१२२५ ते १३७०), dlf(३७० ते ३९४), तसेच सेसा गोवा INFOSYS यांनी बुधवार गुरुवार पर्यंत बाजारात नरमाई असूनही चांगली घोडदौड केल्याचे आपण पाहिले असेल.
आज मात्र बाजाराने सुरुवातीला नरमाई दाखविताच अनेकांनी घाबरून विक्री केल्याचे दिसते.काही प्रसिद्ध वेबसाईटनी बाजार जोरात कोसळणार असल्याचे संकेत दिले होते. मात्र आज दुपारी युरोपियन बाजार खुलताच आपल्याही बाजाराने यु टर्न घेतला व १७००० ची पातळी पुन्हा ओलांडली. टेक्निकल एनालिसीस आणि प्रत्यक्ष बाजाराची दिशा यात हीच तर तफावत राहते.
त्यामुळे बरेच शेअर वधारले मात्र बजाज हिंद सारखे काही शेअर, ज्यांचा सेन्सेक्सशी थेट संबंध नाही ते वाढलेले दिसत नाहीत.अर्थातच ते अजूनही स्वस्त मिळू शकतात असाच त्याचा अर्थ होतो. जागतिक बाजारांनी साथ दिली तर तेजीनेच पुढील आठवड्याची सुरुवात होईल आणि विक्रीच्या संधी नक्कीच उपलब्ध होतील याबद्दल मला शंका वाटत नाही.
सोने आणि सेन्सेक्स यात आता चढाओढ बघायला मिळणार असे दिसत आहे.पण ही दीर्घ पल्ल्याची शर्यत सेन्सेक्सच जिंकणार बरे का !

Read more »

१५ ऑक्टो, २००९

TRYING TO PICK TOPS AND BOTTOMS -नेमका तळ व नेमके शिखर शोधणे-

२) नेमका तळ व नेमके शिखर शोधायला जाणे-
आपल्यापैकी काहीजण बाजार अगदी तळाला गेल्यावर खरेदी करणे पसंत

करतात.विक्रीही अगदी top स्तरावर करण्याचा त्यांचा मानस असतो.पण

जाने.२००८ किंवा त्याआधी काही दिवस बाजार उच्च स्तरावर असताना

माझ्या माहितीतल्या कोणीही आपले भागभांडार रिकामे केलेले नाही.तसेच

बाजार ८००० स्तरावर असताना आपला सर्व पैसा त्यात घातलेले कितीजण

असतील ही सुद्धा शंका आहे.तात्पर्य perfect top व bottom शोधणे

"मुश्कील ही नही नामुम्कीन है!"ते थोडेसे lottery सारखेच आहे म्हणूनच

त्याचा मागे लागणे ही माझ्या मते चूक आहे.
मग आपण काय करायला हवे? आपल्याला जेव्हा वाटेल कि बाजार बराच

खाली आला आहे तेव्हा आपण १/२ किंवा १/३ रक्कम गुंतवायला हवी आणी

बाजार आणखी खाली गेला तर पुन्हा ! मात्र अशी खरेदी प्रमुख कंपन्यांमधेच

हवी कारण बाजार वर येतो म्हणजे सेन्से़क्स वर येतो आणि सेन्सेक्स म्हणजे

दूसरे तिसरे काही नसून याच आघाडीच्या कंपन्या असतात.
त्याचप्रमाणे विक्रीही बाजाराच्या प्रत्येक नवीन उच्च पातळीवर थोडी थोडी

करायला हवी म्हणजे आपण नेहमी थोडेसे cash मध्ये रहातो आणि मग

बाजार पडेल का तरेल त्याची चिंता रहात नाही. काही झाले तरी आपण

त्यासाठी तयारच असतो-आणि हीच यशाची गुरूकिल्ली आहे.
आता आजच्या बाजाराबद्दल- सर्व आशियाई बाजार मजबूत आहेत आणी

आपलाही बाजार दिवाळीच्या मूडमध्येच दिसतो आहे.
आपला बजाज हिंद कसा उसळला आहे बघताय ना ?आणि इंडीया

इन्फोलाईनबाबतचे माझे मत अगदी खरे ठरले आहे. भारती एअरटेलमध्ये

आता पैसा गुंतवला तर long term साठी उत्तम. short term साठी

ril हाच माझा सल्ला आहे.कारण बाकि सर्व आता वाढले आहे. त्यातील

फायदा आता घेत रहा आणि सावध डुलक्या काढा !

शुभ दीपावली!


TRYING TO PICK TOPS AND BOTTOMS

The smartest traders always let the market price action prove a top or bottom has been formed before taking an active position. Trying to pinpoint tops and bottoms is a risky business where the possibility of taking a loss far outweighs the potential gain. By exercising patience and waiting for a definite high or low to appear, you’ll increase your odds for making a profit while reducing your risk and stress.

WISH YOU ALL HAPPY DIWAALEE!

Read more »

२ ऑक्टो, २००९

मंदीचे अस्वल!


वाचकहो, काल बाजार FLAT राहिला, त्याची दोन कारणे होती.गेले दोन दिवसाची तेजी ही भारतीय बाजारातच होती, त्यामानाने इतर बाजार वाढले नव्हते, त्यामुळे विक्री करून फायदा कमावण्यात आला. त्याच बरोबर चीनच्या बाजाराला काल सुटी असल्याने तिकडून काही संकेत नव्हता.
१७००० ची पातळी ओलांडल्याचा Psycological Effect सामान्य गुंतवणूकदारावर होत असला तरी, बाजारातले बडे खिलाडी अशाच वेळी विक्री करून छोट्यांना खिंडीत पकडण्याची शक्यता नेहमीच असते.
तुम्ही म्हणाल कि बाजार वर जात असताना मी असा नकारात्मक सूर का लावत आहे? याचे कारण असे कि बाजार पुन्हा फार मोठ्या प्रमाणावर पडेल असे मलाही वाटत नसले तरी, तो आता सर्वकालीन उच्च पातळीच्या जवळ जात चालला आहे, आणि तेथे विक्री होणार हे मला दुर्लक्षिता येत नाही, आणि आज ना उद्या तो थोडाफार घसरणार असेल तर आपण अगदीच बेसावध असायला नको. हे लक्षांत घ्या कि बाजार जेव्हा २१००० च्या पातळीवर होता तेव्हा कोणीही आपल्याला सावध केले नव्हते, त्याचबरोबर जेव्हा सेन्सेक्स ८००० जवळ होता तेव्हाही जोरात खरेदी करायचा सल्ला आपल्याला कोणी दिला होता काय? तेजीचा बैल उधळताना मोठयाने आवाज करत असला तरी मंदीचे अस्वल मात्र आवाज न करता कधी जवळ येते ते कळत नाही.
तेव्हा आपले निर्णय स्वत:च्या निरीक्षणावर स्वतंत्रपणे घेणे आणि नेहमी stoploss चा वापर करणे श्रेयस्कर ठरेल.
काल रिलायन्स कम्युनिकेशन मधील वाढ लक्षांत आली का? बाजार पडला नाही तर तो ३३० पर्यंत वाढू शकतो.

Read more »

१२ एप्रि, २००९

आजच्या युगात महागाईला तोंड देणे सामान्य नोकरदार वर्गाला अधिकाधिक कठीण होत आहे.ज्या वेगाने महागाई वाढते आहे त्या वेगाने पगार वाढणे शक्य नसते. स्वतंत्र व्यवसाय करण्यासाठी भांडवलाव्यतिरिक्त जी अनेक कौशल्य आत्मसात करावी लागतात - यात त्या व्यवसायाविषयीच्या तांत्रिक माहितीबरोबरच मार्केटींगचे तंत्र व विविध सरकारी खात्यांचे परवाने तसेच करविषयक माहिती, आजच्या काळाला अनुसरून इंग्रजीवरील प्रभुत्व एवढेच नव्हे तर चक्क पटवापटवी करण्याच्या कौशल्याचाही समावेश करावा लागेल -प्रत्येक व्यक्तीमध्ये अशी अनेक विषयांतील पारंगतता कशी बरे असेल? आपल्या मराठी लोकांमध्ये तर गुजराती लोकांच्या तुलनेत व्यवसायाला पुरक असे गुण अजुनही कमी आहेत. अशा परिस्थितीत एखाद्याने प्रयत्न केलाच तरी कुठल्याही व्यवसायात यशाची १००% हमी देता येईल का? मात्र अपयश आले तर आपली होती नव्हती ती सर्वच कमाई घालवून बसणे कोणाला परवडेल?
या सर्व गोष्टींचा विचार करून मराठी माणूस धंद्यात शक्यतो पडत नाही आणि छोटी मोठी नोकरी करत रहातो. वाढत्या महागाईमुळे तो अप्रत्यक्षरित्या हळूहळू पण निश्चितपणे गरीब होत जातो. मग त्याला कधीतरी कोणीतरी शेअरबाजाराची दिशा दाखवतो. त्या अमक्याचे पाच हजाराचे महिन्याभरात वीस हजार झाले,त्या तमक्याने शेअरबाजारातील कमाईवर नवीकोरी कार घेतली वगैरे अविश्वसनीय पण तितक्याच रम्य गोष्टी ऐकून तो हरखतो.हो नाही करता करता आपणही थोडे नशीब अजमावायला काय हरकत आहे असा विचार करून तो दबकतच काही रक्कम गुंतवतो.एखादा अनुभवी म्हणवणारा दोस्त त्याला खास आतल्या गोटातली " टीप" म्हणून पाच-पंचवीस रुपये किंमतीच्या एखाद्या नवीन कंपनीच्या शेअरचे नाव सुचवतो. त्याच खास सोर्सकडून आलेली आधीची टीप ही "गोल्डन टीप" ठरलेली असते आणि त्यावर अनेकांनी अल्पकाळात बदाबदा पैसा कमावलेला असतो वगैरे!
आणि मग व्हायचे तेच होते. आपला हा मराठी मित्र कळत नकळत तो छोटा शेअर खरेदी करतो आणि नेमका त्याच दिवशी बाजार कोलमडतो.’आज बाजारात "सेन्टीमेंट"च निगेटीव्ह होते, आता उद्या बाजार सावरला ना कि बघ आपला शेअर कसा दणादण ऊड्या मारतो ते-’ दोस्ताचे बोलणे सुरूच असते. तसा हा दोस्त चांगला असतो आणि त्याने स्वत:ही तो शेअर घेतलेला असतोच की! अशी आपल्या मनाची समजूत घालत तो दुसर्या दिवसाची आतुरतेने वाट पहातो.
दुसर्या दिवशी काही कारणाने परदेशी बाजार पडतात म्हणुन आपला बाजार पडलेला असतो.असे करता करता आठवडाभर बाजार पडतच रहातो आणि आपल्या शेअरची किंमत पंचवीस रुपयावरून सतरा रुपयावर आलेली असते.आपला मित्र निराश झालेला असतो, त्याला आपले कुठेतरी चुकल्याची जाणिव नक्कीच झालेली असते पण एवढ्या कमी किमतीत शेअर विकून तरी काय मिळणाराय असा विचार करून तो आणखी काही दिवस वाट बघायचे ठरवतो आणि मग चक्क बाजार पुन्हा वर येऊ लागतो, सेन्से़क्स पुन्हा उंच उंच झेपावू लागतो -पण कसचे काय - आपला शेअर वर येणे तर दूरच उलट आणखीच रोडावतो.शेवटी निराश मनाने आपल्या नशिबाला बोल लावत आपला हा मरा्ठी माणुस पंचवीस रुपयाला घेतलेला शेअर अकरा रुपये पन्नास पैशाला विकतो आणि आलेल्या अकरा हजाराचे एन.एस.सी.काढतो.मला सांगा वाईट वाटते ना हे वाचून?
पण खरी दर्दभरी घटना तर पुढेच आहे.आपल्या मित्राने विकलेला तो शेअर दुसर्याच दिवसापासून वाढायला सुरुवात होते आणि महिनाभरातच त्याने चक्क पस्तीस रुपयाची पातळी गाठलेली असते.आपला हा मित्र मात्र पुन्हा शेअरबाजाराचे तोंड बघायचे नाही असा निश्चय करून आपल्या पोराबाळांना सांगण्यासाठी हा अनुभव पदराला लावतो.
मित्रहो, ही सारी कपोलकल्पित कहाणी नव्हे, तर आपल्यापैकी बहुतेकांची थोड्याफार फरकाने झालेली खरीच हकिकत आहे.
मग मराठी माणसाने शेअरबाजारात कधी पडूच नये का? त्याने कायम काबाड कष्ट करूनच पैसा कमवावा का? की याला काही अन्य पर्याय आहे? हे आणि असे बरेच प्रश्न मला पडले आणि मी त्यांची उत्तरे शोधण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला.
या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी आणि सामान्य मराठी माणसाला शेअरबाजारातील धोके सांगण्याबरोबरच त्याच्या मनातील अनावश्यक भीती काढुन त्या जागी आत्मविश्वास जागविण्यासाठी मी हा blog लिहीत आहे.माझ्या मते मराठीतील या विषयाला वाहिलेला हा पहिलाच blog आहे.या माझ्या लिखाणात शेअरबाजाराची तोंडओळख नसून अगोदरच प्राथमिक माहिती व थोडीफार गुंतवणुक असलेल्या पण विशेष फायदा न मिळवलेल्या वा बाजारात नुकसान झालेल्या मराठी मित्रांसाठी चार युक्तीच्या गोष्टी ,काही सोपे आडाखे तसेच किचकट व गुंतागुंतीचे विश्लेषण टाळून सोप्या भाषेतील व सर्वसामान्यांना कळेल अशी माहिती असेल.मी दिलेली माहिती आंधळेपणाने न स्वीकारता वाचकांनी त्यांना योग्य वाटेल त्या ठिकाणी अवश्य पडताळून पहावी ही नम्र विनंती,तसेच थोडेही आर्थिक नुकसान झाल्याने ज्या व्यक्तींचे मानसिक स्वास्थ्य बिघडते त्यांच्यासाठी हे क्षेत्र नाही हे नम्रपणे नमूद करावेसे वाटते.
आज प्रस्तावना म्हणून एवढे पुरे झाले.सुटीचे दिवस वगळता प्रत्येक दिवशी बाजाराचा आढावा घेवून आगामी चाहूल घेण्याचा माझा प्रयत्न राहील.तसेच वाचकांनी रोजच्या बातम्या नियमीतपणे वाचण्याची सवय लावून घेणे श्रेयस्कर आहे.माझ्या वाचकांकडुन आलेल्या योग्य त्या सुचना वा प्रतिक्रियांना प्रसिद्धी देण्याचा माझा प्रयत्न राहील.
येथे नोंदविलेली मते ही कुठल्याही प्रकारची शिफारस नसून आर्थिक निर्णय घेताना ज्याचे त्यानी आपल्या जबाबदारीवर घ्यावेत, ही नम्र विनंती.

Read more »